आपला जिल्हा

गौतम पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर विभागाचा सुनंदा इन्फोटेक कंपनीशी सामंजस्य करार

गौतम पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर विभागाचा सुनंदा इन्फोटेक कंपनीशी सामंजस्य करार

गौतम पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर विभागाचा सुनंदा इन्फोटेक कंपनीशी सामंजस्य करार

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ फेब्रुवारी २०२६ :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाने नुकतीच नासिक येथील प्रसिद्ध सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; कंपनीला औद्योगिक भेट दिली. या भेटीदरम्यान गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य वसीम शेख यांनी दिली आहे.

जाहिरात

 या सामंजस्य कराराबाबत अधिक माहिती देतांना प्राचार्य वसीम शेख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीतील आधुनिक तंत्रज्ञानप्रत्यक्ष प्रोजेक्ट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट याबाबतचे ज्ञान मिळणार असून त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. करारानुसार विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंगइंटर्नशिप तसेच प्लेसमेंटसाठी या कंपनीकडून प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजीप्रोजेक्ट वर्क आणि इंडस्ट्री स्टँडर्ड वर्क कल्चर याबाबत कंपनीच्या तज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार असून त्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे.

जाहिरात

यावेळी सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; मॅनेजर सिद्धार्थ मांडवडे  यांनी विद्यार्थ्यांना कंपनीच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली तसेच भविष्यातील सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.या कार्यक्रमाला संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा. नारायण बारेकार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढेकॉम्प्युटर विभागाचे विभागप्रमुखशिक्षकविद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवताइंडस्ट्रीशी थेट जोडणे ही काळाची गरज आहे. संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा औद्योगिक भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानप्रत्यक्ष अनुभव आणि करिअरच्या जास्तीत जास्त संधी कशा उपलब्ध होतील यासाठी महाविद्यालय प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील.- प्राचार्य वसीम शेख.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे