तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलचे यश
तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलचे यश
गौतम पब्लिक स्कूलचा कुणाल कवडेच्या उपकरणाची जिल्हास्तरीय पातळीवर निवड
कोपरगाव विजय कापसे दि ९ जानेवारी २०२५– कोपरगाव तालुका गणित व विज्ञान ५२ व्या प्रदर्शनाचे (दि.७ ते ८) जानेवारी दरम्यान संवत्सर येथे आयोजन करण्यात आले होते. आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलने या गणित व विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले उपकरणे प्रदर्शित केले होते. यामध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी या गटात गौतम पब्लिक स्कूलच्या कुणाल कवडे याने ‘इको फ्रेंडली अर्थन पॉट’ हे उपकरण सादर करत या गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची दिनांक १७ जानेवारी ते १८ जानेवारी रोजी अकोले येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
या गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये इ.१ ली ते ५ वी, इ.६ वी ते ८ वी व इ.९ वी ते १२ वी असे तीन गट निहाय तब्बल २०० उपकरणे ठेवण्यात आली होती. शाळेच्या वतीने प्राचार्य नूर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हाऊस मास्टर्स प्रकाश भुजबळ, राजेंद्र आढाव, उत्तम सोनवणे व नासिर पठाण यांच्या हस्ते कुणाल कवडे याचा प्रमाणपत्र व विजयी करंडक देऊन सन्मान करण्यात आला.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व कुणाल कवडे याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे, प्राचार्य नूर शेख, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गौतम पब्लिक स्कूलच्या सर्व वैज्ञानिकांना प्रशिक्षित करण्यात शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक राजेंद्र आढाव, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, नासिर पठाण, प्रतिभा बोरनार, प्रतीक्षा देशमुख, निखिल शेळके आदी शिक्षक तसेच कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी यांनी मोलाची कामगिरी बजावली.