समता पतसंस्था
समता पतसंस्थेने घेतला जामीनदाराच्या जमिनीचा ताबा
समता पतसंस्थेने घेतला जामीनदाराच्या जमिनीचा ताबा
समता पतसंस्थेने घेतला जामीनदाराच्या जमिनीचा ताबा
कोपरगाव विजय कापसे दि १० जानेवारी २०२५: समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेचे थकबाकीदार साई कृष्णा ॲग्रो फर्म करिता प्रो.प्रा.सविता संतोष जोर्वेकर यांच्या थकीत रक्कम वसुलीसाठी या थकीत कर्जास जामीनदार असलेले राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील भिकाजी रामनाथ दिघे यांची २२ गुंठे बागायती शेत जमिनीचा ताबा संस्थेने राहुरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक दीपक पराई यांच्याकडून पोलीस बंदोबस्तात घेण्यात आला आहे.
सदर कारवाईसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम ८५ अन्वये जामीनदार यांच्या मालमत्तेचे ‘र’ हस्तांतरण प्रमाणपत्र मिळविलेले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० (२) मधील तरतुदीनुसार उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांच्याकडील जा. क्र.९१६३ दि.१९/१०/२०२३ च्या आदेशान्वये समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्या सहकार्याने विशेष वसुली अधिकारी जनार्दन कदम, श्रीरामपूर शाखाधिकारी फारुख शेख, वसुली अधिकारी दिलीप तेलोरे यांनी सदर कारवाई केली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० (२) अन्वये पुर्वगामी पोट कलमान्वये मालमत्ता संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली असेल किंवा मालमत्तेचे विक्री करण्यात आले असेल तर न्यायालय, जिल्हा अधिकारी किंवा यथास्थितीत निबंधकास अशा रीतीने हस्तांतरित केलेली किंवा विक्री करण्यात आलेली मालमत्ता नियमानुसार संस्थेच्या किंवा यथास्थिती खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या कब्जात घेता येईल अशी तरतूद आहे.