नितीनराव औताडे

मंत्री संजय शिरसाठ यांचे कोपरगाव शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत 

मंत्री संजय शिरसाठ यांचे कोपरगाव शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत 
मंत्री संजय शिरसाठ यांचे कोपरगाव शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत 
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १० जानेवारी २०२५राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शन व मंडप एक्सपोचा कार्यक्रम आटोपल्यावर  येवला येथे आ दराडे यांच्याकडे जात असताना कोपरगाव येथील साईबाबा मंदिर परिसरात आले असता कोपरगावच्या शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या हस्ते सत्कार करत फटाक्याच्या आतषबाजीत  जोरदार स्वागत केले.

जाहिरात
या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना पक्षाची ताकद वाढवणे गरजेचे आहे. यासाठी शहरात व तालुक्यात शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा निर्माण करणे गरजेचे आहे. शिवसेना शाखेच्या वतीने शिवसैनिक जोडले की संघटना बळकट होते. कोपरगाव शहर व तालुक्यातील शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाठ यांनी केले.

जाहिरात
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे, बाजार समितीचे संचालक सर्जेराव कदम, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, देवा लोखंडे, आरती गाडे, मुमताज शेख, शहर प्रमुख अक्षय जाधव, बाळासाहेब बढे, मीनानाथ जोंधळे, घनश्याम वारकर, शिवाजी जाधव, सुनील साळुंके, निलेश चौधरी, मनोज राठोड, पवन गायकवाड, सुनी गायकवाड आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे