आपला जिल्हा

रविवारी कोपरगावात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रविवारी कोपरगावात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रविवारी कोपरगावात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ९ एप्रिल २०२६-निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) स्थापना दिनानिमित्त शाखा कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात

संकल्प फाउंडेशन, कोपरगाव, मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेर तसेच वाघडकर जनरल हॉस्पिटल, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिबिरामध्ये हृदयविकार, सांधेदुखी व हाडांचे आजार तसेच किडनी (मूत्रविकार) संबंधित आजारांवर मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जाहिरात

या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार असून मूत्रविकार तज्ञ डॉ. योगेश तोरकडी, हृदयरोग तज्ञ डॉ. अमेय इथापे तसेच अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल रहांगडले हे रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सुलभ व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नाव नोंदणी साठी संपर्क- 8686229494

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे