तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेकडून ग्रामविकास मंत्री मा. ना. गोरे यांना निवेदन
तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेकडून ग्रामविकास मंत्री मा. ना. गोरे यांना निवेदन
तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेकडून ग्रामविकास मंत्री मा. ना. गोरे यांना निवेदन

अहिल्यानगर विजय कापसे दि १२ जानेवारी २०२५–ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमार गोरे यांनी आज आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट राळेगण सिद्धी येथे भेट घेतली. या वेळी डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या संकल्पनेतून व अथक परिश्रमातून निर्माण झालेले भारतातील ग्रामीण विकासातील रोल मॉडेल व्हिलेज (राळेगणसिद्धी ता.पारनेर जिल्हा अहिल्यानगर) येथे महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने मा.मंत्री महोदय यांना राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी मंत्री महोदय यांच्या दालनात संघटनेला बैठकीसाठी व चर्चेसाठी वेळ देण्याबाबत निवेदन देऊन विनंती करण्यात आली.

त्यावेळी लवकरच मंत्रालयात संघटणेसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी संघटणेच्या शिष्टमंडळास दिले. संघटणेने या भेटी दरम्यान ग्राम विकास विभागाकडील नुकत्याच निघालेल्या पत्रानुसार क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात यावे असे सुचविले आहे, परंतु क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना बायोमेट्रिक हजेरी लागू केल्यास कोणकोणत्या अडचणी येवु शकतात व त्यामुळे ग्रामपंचायतमधील विकास कामावर कसा परिणाम होतो ते निदर्शनास आणुन देवुन या संवर्गास बायोमेट्रिक हजेरी लागु करू नये अशी मागणी संघटणेच्या वतीने राज्य सचिव श्री.हरिश्चंद्र काळे यांनी केली.

सदर निवेदनात दिनांक २४ -०९-२०२४ च्या शासन निर्णया मुळे वेतन बाबत जी असमानता निर्माण होऊन वेतनात जी तफावत येत आहे त्याबाबत जर स्वंयस्पष्ठ शुद्धिपत्रक ग्रामविकास विभागाकडुन निर्गमित केले तर राज्यातील ग्रा.पं.अ. संवर्गास खर्या अर्थाने न्याय मिळुन जाईल व सदर शासण निर्णयानुसार संवर्गाची वेतनत्रुटी दुर होण्यास मदत होईल अशी मागणी राज्य अध्यक्ष नितिन धामणे, राज्य कार्याध्यक्ष मधुकर मुंगल, राज्य कोषाध्यक्ष महेंद्र निकम व सर्व पदाधिकारी यांचे वतीने संघटणेतर्फे करण्यात आली.

यावेळी शिष्टमंडळासमवेत महाराष्र्ट राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे नाशिक विभागिय उपाध्यक्ष राजेंद्र कंदलकर,शशिकांत नरोडे (जिल्हासचिव, अहिल्यानगर) वैशाली बोरुडे, तालुकाध्यक्ष बळीराम शेटेवाड सचिव शरद गायकवाड,राजू विधाते व अन्य संघटना पदाधिकारी उपस्थित होते अशी माहीती संघटणेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख आशीष चौधरी (माहुर,नांदेड) यांनी दिली.



