आपला जिल्हा
केमिस्ट असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेत केमिस्ट हृदय सम्राट ११ संघास प्रथम पारितोषिक
केमिस्ट असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेत केमिस्ट हृदय सम्राट ११ संघास प्रथम पारितोषिक
केमिस्ट ह्रदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित डॉक्टर – केमिस्ट – वैद्यकीय प्रतिनिधी क्रिकेट स्पर्धा
कोपरगाव विजय कापसे दि १६ जानेवारी २०२५– अखंड भारतातील केमिस्ट बांधवांचे दैवत केमिस्ट ह्रदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित डॉक्टर – केमिस्ट – वैद्यकीय प्रतिनिधी क्रिकेट स्पर्धा रविवारी, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी आत्मा मालिक क्रीडा संकुल, कोकमठाण, कोपरगाव येथे मोठया जल्लोषात संपन्न झाली.
या स्पर्धेत कोपरगावातील केमिस्ट हृदय सम्राट ११ संघाने कर्णधार आकाश वडांगळे यांच्या नेतृत्वात कोपरगावातील डॉक्टर्सच्या हिट स्क्वाड संघाला पराभूत करत प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत एकूण ८ संघांचा समावेश होता आणि प्रत्येक संघाने चांगलीच कामगिरी केली.
या स्पर्धेचे उदघाटन अन्न व ‘औषधे प्रशासन, विभागाचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेतकर, बचत गटाच्या रेणुकाताई विवेकभैया कोल्हे , येवला येथील ए. आय.ओ. सी.डी. एस चे संचालक रविभाऊ पवार यांच्या हस्ते तर विजयी संघाना डॉ अजेय गर्जे, डॉ दीपक नाईकवाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.