मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त १६ फेब्रुवारी रोजी संगमनेर मध्ये महानोकरी मेळावा
विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार:–आमदार सत्यजित तांबे
या महानोकरी मेळाव्या बाबत माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका व शहर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनले आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल ,वकील, ग्रॅज्युएट असे हजारो विद्यार्थी दरवर्षी या ठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.
शिक्षण हे समाज प्रगतीचे प्रभावी माध्यम असल्याने थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १९६७ मध्ये सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेची स्थापना केली. तर १९८३ मध्ये अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना करून इंजिनिअरिंग ,पॉलीटेक्निक , फार्मसी एमबीए यांसह उच्च शिक्षण देणारी संस्था सुरू केली . वैद्यकीय शिक्षणासाठी २००० मध्ये एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून डेंटल कॉलेज व इतर मेडिकल कॉलेज सुरू केले. यामधून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे पाठोपाठ संगमनेर हा शिक्षणाचा ब्रँड झाला असल्याने अनेकांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत आहेत.
माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील युवकांसाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे मुंबई ,दिल्ली ,पुणे ,बंगलोर, हैदराबाद चेन्नई येथील विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग ,सेल्स यांसह जगभरातील नामांकित अशा आयटी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते इंजीनियरिंग ,पॉलिटेक्निक, डी फार्मसी, बी फार्मसी ,ग्रज्युएट, कॉमर्स सायन्स यांसह दहावी बारावी, आयटीआय सह विविध कोर्स झालेल्या विद्यार्थ्यांच्या इंटरव्यू घेणार आहेत.
यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देऊन त्यांना कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे .याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना विशिष्ट स्किलचे ट्रेनिंग देऊन त्यांना नोकरीपात्र बनण्यासाठी प्रशिक्षण घेतले जाणार आहे. तरी या भव्य दिव्य महानोकरी मेळाव्यात सर्व तरुण व तरुणींनी सहभागी होण्यासाठी मुलाखतीची तयारी सुरू करावी . तसेच महानोकरी मेळाव्या बाबत वेळोवेळी सर्व युवकांना याची माहिती दिली जाईल असे सांगताना या महानोकरी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले करिअर घडवावे असे आवाहन आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांची मुलाखतीतून थेट निवड
विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यासह बँकिंग ,फायनान्स व आयटी क्षेत्रातील कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून विद्यार्थ्यांची इंटरव्यू घेणार आहेत. दहावी बारावी सह विविध ग्रॅज्युएट विद्यार्थी यांच्या इंटरव्यू होणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ निवडीचे पत्र देऊन नोकरीची संधी मिळणार आहे तर ज्यांची निवड होणार नाही त्यांना योग्य ट्रेनिंग देऊन निवडपात्र बनवले जाणार असल्याने संगमनेर तालुक्यातील युवकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे