शहरातील गोहत्या होणारे ठिकाणे कायमची उध्वस्त करा- माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे
शहरातील गोहत्या होणारे ठिकाणे कायमची उध्वस्त करा- माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि २४ जानेवारी २०२५– मागील २-३ दिवसांपूर्वी कोपरगाव शहर पोलीस व कोपरगाव नगरपरिषदेने संजयनगर संयुक्तरित्या आयेशा कॉलनी परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर गोहत्या रोखण्यासाठी कारवाई करुन काही गोवंश व गोमांस जप्त केल्याबद्दल सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन पण वारंवार कारवाया करुनही बिनधास्तपणे गोहत्या सुरुच असते.या कारवाईचा फारसा परिणाम गोहत्या करणा-या कसायांवर होत नाही.म्हणून ज्या ठिकाणी गोहत्या होते, जेथे गायी डांबून ठेवल्या जातात, जेथे गोमांस जप्त केले अशी ठिकाणे पूर्णपणे कायमस्वरूपी उध्वस्त करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना दिले आहे.
जाहिरात
वहाडणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराचे आरोग्य व कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ द्यायची नसेल तर संबंधित बेकायदा ठिकाणे त्वरीत उध्वस्त करुन दोषी व्यक्तींना तडीपार केले पाहीजे आणि जर येणा-या १५ दिवसात अशी कारवाई प्रशासनाने केली नाही तर मला आंदोलन करावे लागेल आणि आंदोलन सुरु झाल्यास त्याचे काही विपरीत परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असलेली ही ठिकाणी कायमस्वरूपी उध्वस्त करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी निवेदन देत केली असून सदर निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक तालुका कोपरगाव पोलीस ठाणे यांना देखील पाठविली आहे.जाहिरात