आपला जिल्हा

राज्य अन्न आयोगाची कोपरगाव शासकीय धान्य गोदामास भेट

राज्य अन्न आयोगाची कोपरगाव शासकीय धान्य गोदामास भेट

राज्य अन्न आयोगाची कोपरगाव शासकीय धान्य गोदामास भेट

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ६ फेब्रुवारी २०२५तालुक्यातील शासकीय धान्य गोदामी व शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामी तसेच महिला बाल विकास सेवा योजना अंतर्गत पुरवठादार वदामांना. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे तसेच सचिव प.फ. गांगवे यांनी नुकतीच भेट दिली आहे.

जाहिरात

राज्य आणि आयोगाचे अध्यक्ष व सचिव यांचा जिल्हास्तरीय दौरा चालू असून त्यांनी आज कोपरगाव येथील सर्व शासकीय धान्य गोदामांना तसेच स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन पाहणे केली आहे. यावेळी राज्य अन्न आयोग यांचे कडील आदेशान्वये मा. जिल्हापुरवठा अधिकारी अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी व मा. तहसिलदार यांचे हस्ते तालुक्यातील भटक्या जमातीमधील फासेपारधी समाजातील कुटुंबाना महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणांनुसार ई-कार्ड प्रणालीव्दारे नविन शिधापत्रिका देण्यात आल्या. फासे पारधी समाजातील कुटुंब अनेक वर्षापासुन जिवनाश्यक वस्तु करीता वंचित असल्याने आता नविन शिधापत्रिका मिळाल्याने आनंद व्यक्त केला असुन नविन शिधापत्रिकावर शासनाकडुन मिळणारे मोफत धान्य, तसेच इतर वस्तु मिळणार असल्याचे मा. तहसिलदार महेश सावंत यांनी सांगितले.

जाहिरात

सदर प्रसंगी – पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल फोफसे, पुरवठा निरीक्षक नितीन देशमुख, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव चरमळ, संघटनेचे पदाधिकारी सागर नरोडे, बाबासाहेब मवाळ, कैलास सानप, सागर पुंगळ, विलास मोरे आदीसह पारधी समाज बांधव उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे