आगामी निवडणुकीत सर्वोदूर महाविकास आघाडीचाच डंका-ॲड.संदीप वर्पे
आगामी निवडणुकीत सर्वोदूर महाविकास आघाडीचाच डंका-ॲड.संदीप वर्पे
आगामी निवडणुकीत सर्वोदूर महाविकास आघाडीचाच डंका-ॲड.संदीप वर्पे

कोपरगाव विजय कापसे दि ३ नोव्हेंबर २०२५- गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका,महानगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे शेतकरी संकटात असताना सरकार फक्त पक्ष वाढीकडे लक्ष देत असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते ॲड.संदीप वर्पे यांनी त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

नुकतीच कोपरगावचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित असलेले ॲड.संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोमवार दि ३ नोव्हेंबर रोजी कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते.



कोपरगाव विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मी उमेदवारी केली असता मला मतदारांनी देखील भरघोस मत रुपी आशीर्वाद शुभेच्छा दिल्या या सर्वांचा आणि या साठी अहोरात्र प्रयत्न करणारे माझे सहकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक, काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.कोपरगाव शहर आगामी नगरपालिका निवडणूकीत महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षानी वयक्तिक निर्णय घेत वेगवेगळे उमेदवार देण्याचे जाहीर केले असतांना मी कोपरगावमधील त्या दोन्ही पक्ष नेत्यांना भेटून महाविकास आघाडीचा सर्वानुमते एकच उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवेल आणि त्याला आपण मोठ्या मताने निवडून आणू असा विश्वास ॲड.संदीप वर्पे हे त्यांना देणार आहे.



