कोपरगावात पोलिसांकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबिर
कोपरगावात पोलिसांकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबिर
संकल्प फाउंडेशन, डॉ वाघडकर व वृंदावन डायग्नोस्टिकचा अभिनव उपक्रम

कोपरगाव विजय कापसे दि २२ मार्च २०२५– नेहमीच सामाजिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या एक तास स्वतःसाठी आरोग्यमय जीवनासाठी या संकल्पने अंतर्गत कोपरगाव येथील संकल्प फाउंडेशन, डॉ वाघडकर जनरल हॉस्पिटल व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव आपले कर्तव्य बजावत असलेले कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या मागे भक्कम पणे सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांकरता कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये आज शुक्रवार दि २२ मार्च रोजी सकाळी १० ते २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हेल्थ इज वेल्थ आरोग्य धनसंपदा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात मधुमेह, दमा, पोटाचे विकार, थायरॉईड, मायग्रेन, हृदयरोग, उच्च रक्तदाब, एलर्जीक खोकला, वारंवार सर्दी आदि आजारांची तपासणी केली जाणार असून तरी जास्तीत जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संकल्प फाउंडेशन, डॉ वाघडकर जनरल हॉस्पिटल व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांनी केले असून नाव नोंदणी करता ७४२१९१९१९१ व ८६८६२२९४९४ या नंबर वर संपर्क साधावा.






