आपला जिल्हा

नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख यांचा निवडीबद्दल सत्कार 

नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख यांचा निवडीबद्दल सत्कार 

नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख यांचा निवडीबद्दल सत्कार 

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २७ फेब्रुवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील उपसरपंच पदी वसीम सय्यदनूर शेख उर्फ बबलूभाई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अरूण खरात यांचे हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास सरपंच किरण  होन, द्वारकानाथ  होन, तुळसिदास होन, अर्जुन होन, विलास चव्हाण, मल्लूभाऊ होन, धीरज बोरावके, पोपट आल्हाट, अर्जुन बोरवके, ओंकार आहेर आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी सत्काराला उत्तर देताना उपसरपंच वसीम शेख म्हणाले की तालुक्याचे  आमदार आशुतोष  काळे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून माझ्या गळ्यात उपसरपंच पदाची माळा अर्पण केली या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही. मी जनतेच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहील तसेच गावामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्यात चांगल्या सुख सुविधा कशा उपलब्ध करता येतील व योजना राबवता येतील यासाठी सदैव प्रयत्न करीन असा विश्वास व्यक्त केला.

जाहिरात

यावेळी सरपंच किरण होन म्हणाले की आम्ही दोघेही एकदिलाने काम करू व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा देऊ व चांदेकसारे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करू. यावेळी उपस्थित सर्वांनीच वसीम शेख यांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे