कोल्हे गट

जागतिक महिला दिनानिमित्त टाकळी ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम; एक दिवसीय महिला सरपंच व महिला उपसरपंच म्हणून दिला मान.

जागतिक महिला दिनानिमित्त टाकळी ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम; एक दिवसीय महिला सरपंच व महिला उपसरपंच म्हणून दिला मान

जागतिक महिला दिनानिमित्त टाकळी ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम; एक दिवसीय महिला सरपंच व महिला उपसरपंच म्हणून दिला मान.

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ८ मार्च २०२५कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले. त्यामध्ये सरपंच  संदीप श्रीपत देवकर यांच्या संकल्पनेतून आजच्या महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करनेहेतु एक दिवसीय महिला सरपंच म्हणून कल्पना लक्ष्मण मालकर व महिला उपसरपंच म्हणून भारती बाळासाहेब देवकर यांना संधी देण्यात आली.

जाहिरात

एक दिवसीय महिला सरपंच यांचा सत्कार  संदीप  देवकर व एक दिवसीय महिला उपसरपंच यांचा सत्कार माजी सभापती सुनील  देवकर यांनी केला. तसेच गावातील महिला विजया नंदू आमले यांचा आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास कोपरगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी  शबाना शेख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

जाहिरात

याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच संजय देवकर ग्रामपंचायत सदस्य  शशिकांत देवकर, रूपाली मालकर,  हिराबाई मोरे, ग्रामपंचायत अधिकारी  गुंड भाऊसाहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका कांता देवकर , रणधीर सर, पोलीस पाटील  राजेंद्र देवकर तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर गावातील महिला उपस्थित होत्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे