तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये महिला दिन साजरा
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये महिला दिन साजरा
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२५– कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन मोठया उत्साहात कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला.
जाहिरात
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. यातीलच एक म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत मंजूर झालेले व प्रथम हप्ता वितरण झालेल्या घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यासाठी भूमिपूजनाचा तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश देखील करण्यात आला.जाहिरात
तसेच महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी शिबिरे ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने शुगर बीपी, हिमोग्लोबिन आदी तपासणी मोफ़त करण्यात केली.तसेच महिलांना विविध भेटवस्तू वाटप करण्यात आल्या तर तालुक्यातील चांदेकसारे येथे कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला.जाहिरात