आपला जिल्हा

संगमनेरचा दिवाळी पहाट गाणी सर्वोत्तम–माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेरचा दिवाळी पहाट गाणी सर्वोत्तम–माजी मंत्री बाळासाहेब थोरात

आशा भोसले,नाना पाटेकर, मधु कांबीकर यांच्या आठवणी जागवल्या

Sangmner vijay kapse दि १२ नोव्हेंबर २०२६– राज्यात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम होतात, या कार्यक्रमांची तुलना केली तर संगमनेरचा कार्यक्रम सरस ठरेल इतका दर्जेदार कार्यक्रम इथले कलाकार सादर करतात. दीपावली हा आनंदाचा कालखंड असतो. आणि या काळातील सांस्कृतिक कार्यक्रमांमधील संगमनेरचा पहाट गाणी कार्यक्रम हा सर्वोत्तम ठरतो असे गौरवउद्गार  राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेव थोरात यांनी केले. या पहाटगाणी कार्यक्रमातमधून पद्मश्री आशा भोसले, नाना पाटेकर, मधू कांबीकर यांना अभिवादन करण्यात आले.

जाहिरात

भंडारी मंगल कार्यालय येथे संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि वाचन कट्टा समुहाच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,  कांचन थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे,एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, अमृतवहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे, उत्कर्षा रुपवते आदी मान्यवर उपस्थित होते. येथील ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास आणि लोककला अभ्यासक डॉ. संतोष खेडलेकर यांची संकल्पना आणि निवेदन असलेल्या या कार्यक्रमात  दिवंगत गायिका आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अभिनेत्री मधू कांबीकर, अभिनेते नाना पाटेकर यांना सांगितिक आदरांजली वाहण्यात आली.
याचबरोबर भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून धरण आणि परिसरात चित्रित झालेली विविध सिनेमातील गाणी सादर करून धरणाबद्दल सांगितिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

जाहिरात

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रत्येक जण वर्षभर धावपळ करत असतो. दीपावली हा चार दिवस आनंदाचा कालखंड असतो. तो प्रत्येकाने आनंदाने घेतला पाहिजे दिवाळी काळामध्ये संगमनेर मध्ये होणारा पहाट गाणी कार्यक्रम हा सर्वोत्तम असतो या कार्यक्रमाची प्रत्येकाला ओढ असते आणि यावर्षी स्वर्गीय आशा भोसले, सुमन कल्याणपुरकर, नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या आठवणी जागवल्या आहेत. सर्वांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम केल्याने हा एक अप्रतिम कार्यक्रम लक्षात राहणारा आहे. संगमनेरला साहित्य, कलावंत, विचारवंत यांची मोठी परंपरा राहिली आहे. ही समृद्ध परंपरा आपल्या सर्वांना जोपासायची असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की डॉ संतोष खेडलेकर यांच्या माध्यमातून हा सुंदर कार्यक्रम दरवर्षी आपण या ठिकाणी घेत असतो. पहाट गाणी कार्यक्रम हा संगमनेरचे सांस्कृतिक वैशिष्ट्य ठरत असल्याचे ते म्हणाले तर डॉ जयश्री थोरात म्हणाल्या की, पहाट गाणी या कार्यक्रमाची परंपरा मोठी राहिली आहे. संगीत हे प्रत्येकाला आनंद देणारे असून आनंदाच्या काळामध्ये पहाट गाण्यामुळे आणखी आनंद द्विगुणीत होतो असे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी मराठी इंडियन आयडॉल फेम गायिका सुरभी कुलकर्णी, विकास भालेराव या गायकांनी सादर केलेल्या गाण्यांना सत्यजित सराफ, अजित गुंदेचा, श्रीकांत गडकरी, दिलावर शेख, वैभव पवार यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू आर्किटेक्ट अभिजित खेडलेकर यांनी तर समन्वयक म्हणून देवीदास गोरे आणि महत्वाची भूमिका बजावली. इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष द्वारकानाथ राठी, डॉ. अरविंद रसाळ यांच्यासह संगमनेर परिसर आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले रसिक उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे