दहेगाव बोलका येथे गॅस टाकीचा स्फोट एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती जखमी; आ. आशुतोष काळेंच्या तातडीने उपचार करण्याच्या आरोग्य विभागाला सूचना
दहेगाव बोलका येथे गॅस टाकीचा स्फोट एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती जखमी; आ. आशुतोष काळेंच्या तातडीने उपचार करण्याच्या आरोग्य विभागाला सूचना
दहेगाव बोलका येथे गॅस टाकीचा स्फोट एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती जखमी; आ. आशुतोष काळेंच्या तातडीने उपचार करण्याच्या आरोग्य विभागाला सूचना

Kopargaon vijay kapse दि २१मे २०२६–कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे गुरुवार (दि.२१) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस टाकीचा स्फोट होवून एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची बातमी समजताच आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

दहेगाव बोलका येथे गुरुवार (दि.२१) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास सुनील सोन्याबापू कर्पे यांची मुलगी भाग्यश्री (वय १८) हि गॅस स्वयंपाक करीत असतांना अचानकपणे गॅस टाकीचा स्फोट होवून यामध्ये सुनील कर्पे स्वत: त्यांची मुलगी भाग्यश्री व मुलगा ओंकार (वय १६) हे जखमी झाले. गॅस टाकीचा स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज होवून घराच्या पत्र्यांचे देखील नुकसान झाले आहे. सदरच्या घटनेबाबत आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला सूचना देण्याबरोबरच गॅस टाकीचा स्फोट कशामुळे झाला याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

सुनील कर्पे यांची पत्नी घराबाहेर कपडे धूत असल्यामुळे व त्याची आई देवदर्शनासाठी मंदिरात गेल्यामुळे सुदैवाने त्यांना काही झाले नाही. सदर घटनेसंदर्भात आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गुट्टे तसेच पुढील उपचाराची गरज पडल्यास जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही या घटनेची माहिती देवून तातडीने उपचार करण्याच्या करण्याच्या सूचना दिल्या. मात्र जखमी तिघांचीही प्रकृती काहीसी गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे दाखल करण्यात आले. आ.आशुतोष काळे यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपचार सुरु करण्यास सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत. आ.आशुतोष काळे यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरून जखमी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करून आपुलकीने विचारपूस केली आहे. मोलमजुरी करणाऱ्या कर्पे कुटुंबातील तीन व्यक्ती अशा दुर्दैवी घटनेत जखमी झाल्यामुळे दहेगाव बोलका व पंचक्रोशीतील नागरीकांकडूनन हळहळ व्यक्त केली जात आहे.




