विखे-पाटील

महायुतीवर विश्‍वास दाखवून मतदारांनी जिल्‍ह्यातील  दहा विधानसभा मतदार संघामध्‍ये दिलेले यश हीच भेट माझ्या वाढदिवसासाठी खुप मोठी – डॉ.सुजय विखे पाटील 

महायुतीवर विश्‍वास दाखवून मतदारांनी जिल्‍ह्यातील  दहा विधानसभा मतदार संघामध्‍ये दिलेले यश हीच भेट माझ्या वाढदिवसासाठी खुप मोठी – डॉ.सुजय विखे पाटील 

 डॉ.सुजय विखे पाटील  यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात विविध उपक्रमांनी साजरा

जाहिरात जोशी

लोणी विजय कापसे दि.२४ नोव्हेंबर २०२४ महायुतीवर विश्‍वास दाखवून मतदारांनी जिल्‍ह्यातील मतदारांनी दहा विधानसभा मतदार संघामध्‍ये दिलेले यश हीच भेट माझ्या वाढदिवसासाठी खुप मोठी आहे. आता निवडणूका संपल्‍या असल्‍याने जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेला गती देणार असल्‍याचे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

जाहिरात म्हस्के

       डॉ.सुजय विखे पाटील यांना वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने संपूर्ण जिल्‍ह्यातून महायुतीतील पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने जनेसवा कार्यालयात उपस्थित होते. कुठल्‍याही अभिष्‍टचिंतन सोहळ्याचे आयोजन न करता डॉ.विखे पाटील यांनी शुभेच्‍छांचा स्विकार केला. विविध संस्‍थाचे आधिकारी यांचीही या निमित्‍ताने उपस्थिती होती.

जाहिरात जगताप

माध्‍यमांशी संवाद साधताना डॉ.विखे पाटील म्‍हणाले की, या शुभेच्‍छारुपी प्रेमाच्‍या पाठबळावरच आजपर्यंतची वाटचाल आपण केली. सर्वसामान्‍य जनतेशी राहीलेला संवाद यामुळे नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या  विधानसभा निवडणूकीत मोठे यश हे महायुतीला मिळाले. जिल्‍ह्यातील जनतेने महायुतीच्‍या कामावर तसेच योजनांच्‍या झालेल्‍या  अंमलबजावणीवर विश्‍वास व्‍यक्‍त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतील फरक जनतेच्‍या लक्षात आला त्‍यामुळेच महायुतीला पुन्‍हा  राज्‍यात संधी देण्‍याचा निर्धार जिल्‍ह्यातील जनतेने केला होता. दहा विधानसभा मतदार संघामध्‍ये महायुतीचे आमदार आज विजयी झाले याचा सर्वाधिक आनंद आहे.

जाहिरात निखाडे

प्रचाराच्‍या निमित्‍ताने शिर्डी मतदार संघातील अनेकजन येवून आमच्‍या विरोधात वक्‍तव्‍य करीत होती. पण जनताही विकासाच्‍या मागे ठामपणे उभी राहते. ज्‍यांनी खोटे आरोप केले, त्‍यांना जिल्‍ह्यातील जनतेने मतदानाच्‍या माध्‍यमातून धडा शिकविला असल्‍याचे सांगतानाच आता निवडणूक प्रक्रीया संपली आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जे जे शब्‍द आम्‍ही दिले आहेत ते पुर्ण करण्‍याची कटिबध्‍दता आम्‍ही ठेवणार असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले.

जाहिरात पहाडे
जाहिरात देवकर
जाहिरात लकारे
जाहिरात लहिरे
जाहिरात गुंजाळ

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे