ओगदी ग्रामस्थांच्या वतीने स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा
ओगदी ग्रामस्थांच्या वतीने स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि २४ मार्च २०२५– सहकारमहर्षीमाजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी नेहमी मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा विचार ठेऊन काम केले. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. कोपरगाव आणि परिसराचे नंदनवन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत दूरदृष्टी जोपासली.त्यांच्याच या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त सगळीकडे प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून त्याच अनुषंगाने तालुक्यातील ओगदी ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दि २४ मार्च रोजी साहेबांना अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
जाहिरात
या प्रसंगी ओगदी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पोळ, जेष्ठ मार्गदर्शक बाळनाथ जोरवर, देवराम रुपनर, तान्हाजी करवर, जाखु जोरवर, राजाराम गोणटे, रत्न जोरवर, शंकर रुपनर राहुल कोल्हे, सोसायटी सेक्रेटरी शिंदे भाऊसाहेब,गणपत बिन्नर आदी सह ओगदी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.जाहिरात
या प्रसंगी उपस्थित असलेल्या ओगदी गावच्या ग्रामस्थांनी माजी मंत्री सहकाराचे जनक सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या आठवणीना उजाळा देत त्यांनी कोपरगाव तालुक्यासह संबंध राज्यातील तळागाळातील सर्वच समाजासाठी केलेल्या महान कार्याची महती सांगत साहेबांना आदरांजली व्यक्त केली.जाहिरात