धोत्रे गावात माजी मंत्री स्व.कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा
धोत्रे गावात माजी मंत्री स्व.कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा
धोत्रे गावात माजी मंत्री स्व.कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा

कोपरगाव विजय कापसे दि २५ मार्च २०२५– कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते शेतकरी ,कष्टकऱ्यांसाठी व गावच्या सर्वांगीण विकासाठी अहोरात्र प्रयत्न करून घरोघरी विकासगंगा निर्माण करणारे स्वर्गीय माजी मंत्री सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त संबंध तालुक्यात त्यांनी केलेल्या विकासात्मक कामाची आठवण म्हणून प्रेरणा दिन साजरा केला जात असून अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायतीच्या वतीने देखील गावातील प्रतिष्ठित नागरिक तुकाराम शिंदे यांच्या शुभहस्ते माजी मंत्री स्व.कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत गावात विविध उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी गावच्या स्वच्छतेसाठी सुका कचरा ओला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटा गाडीचे लोकार्पण सुर्यभान घाटे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या प्रसंगी सुरेश जाधव यांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांचे कामाचे कौतुक करत या उपक्रमातून गावातील कचरा व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होऊन गाव स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकणार असल्याचे सांगितले तर गावचे ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे व लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून गावातील दिव्यांगांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

या प्रसंगी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांनी अभिवादन करतांना सांगितले की, स्वर्गीय कोल्हे साहेब आमचे प्रेरणास्थान आहे त्यांच्या कार्यातून आम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी ते लढणारे कणखर असे नेतृत्व होते त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी असून म्हणूनच आह्मी हा प्रेरणा दिन साजरा करत आहोत.

या प्रसंगी संजीवनी सहकारी बँकेचे संचालक सुरेश जाधव, ज्ञानदेव आगवण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण,कचेश्वर घाटे, सुनील वैद्य, माजी चेअरमन किरण चव्हाण, शेशराव शिंदे, उपसरपंच आरती जामदार, ग्रामपंचायत सदस्या भारती जामदार, भाऊसाहेब गागरे, नामदेव चव्हाण, आरुण साळुंके, जयवंत शिंदे, संजय जामदार, संतोष चव्हाण, करङे सर,अश्विन जामदार, विलास शिंदे,अजम भाई, विशाल खाबीया आदी सह ग्रामस्थ मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.




