आपला जिल्हा

करंजीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत साजरी केली इफ्तार पार्टी

करंजीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत साजरी केली इफ्तार पार्टी

करंजीत नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २७ मार्च २०२५सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या पर्वकाळात संपूर्ण देशभरातील मुस्लिम बांधव अत्यंत कडक उपवास करत असतात आणि हेच पवित्र उपवास सोडवण्यासाठी संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा उपवास सोडवण्यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी जामा मस्जिद ट्रस्ट करंजी येथे गावातील हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्र येत बुधवार दि २६ मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

या प्रसंगी करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण, उपसरपंच शिवाजी जाधव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चांगदेव आगवण, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती नवनाथ आगवन,अमृत संजीवनीचे देवीदास भिंगारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, करंजी सोसायटीचे चेअरमन बंडू आगवन, डॉ सुनिल देसाई, लक्ष्मण भिंगारे, गणेश भिंगारे, सुनील आगवन,संजय उगले, मौलाना मोसीन साहेब,

जाहिरात

हारून शेख, चौरंगीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आयुब शेख,अशपाक मणियार, जाकीर शेख, आशरफ बाबूलाल इनामदार, ऍग्रो लक्ष्मी बँकेचे चेअरमन राजू शेख, आशपाक इनामदार, युनूस शेख, सिंकंदर शेख, शोएब शेख, आशपाक उंबर शेख, रज्जाक जेहुर शेख,समीर अल्लाबकस शेख,मुनिर बाबूभाई शेख,सलीम दगुभाई शेख, जमिल शेख, तोफिक शेख, समीर शेख, चौरंगीनाथ ऍग्रोचे जाहिद शेख,जुबेर शेख,अमन शेख,शकील शेख, सुलतान शेख,साहिल शेख, कय्युम शेख, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक मानेखा पठाण, अन्वर पठाण, मदेखा पठाण,मुनिर पठाण, निसार पटेल, मुस्ताक पटेल, अकबर शेख,बशीर शेख आदि सह सर्व धर्मीय करंजी ग्रामस्थ मोठया संख्येने इफ्तार पार्टी साठी उपस्थित होते.

जाहिरात

याप्रसंगी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांचा वेगवेगळी,फळे,ज्यूस, अन्नदान करत उपवास सोडण्यात आला तर उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान च्या शुभेच्छा दिल्या तर आशरफ इनामदार यांनी सर्व उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे