सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन
सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन
सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि ३० मार्च २०२५– राहता तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळवाडी येथे सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती हरिभक्त परायण मधुसूदन गिरी महाराज यांनी दिली आहे.
राहता तालुक्यातील पिंपळवाडी येथील भगवान सोमेश्वर देवस्थान आश्रमात दिनांक २/४/२०२५ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजता ह. भ.प. विजय महाराज गुंजाळ, दि .३/४/२०२५ रोजी ह भ प मधुसूदन महाराज, दिं.४/४/२०२५ रोजी ह भ प अर्जुन महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच दिनांक ५/४/२०२५ रोजी सकाळी १० वाजता सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. दरम्यानच्या काळात दररोज गुरुचरित्र पारायण, हरिपाठ,काकडा, भजन होणार आहे. तरी भाविकांनी ज्ञानामृत व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पिंपळवाडी व भजनी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.