सण उत्सवातून निर्माण झालेले ऐक्याचे वातावरण कायम जपले जावे – विवेकभैय्या कोल्हे
सण उत्सवातून निर्माण झालेले ऐक्याचे वातावरण कायम जपले जावे – विवेकभैय्या कोल्हे
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि ३१ मार्च २०२५-कोपरगाव शहरातील नवीन कब्रस्थान (105, हनुमान नगर) आणि इदगाह मैदान (कोर्ट रोड) येथे रमजान ईद निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, मुस्लिम बांधव व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात
कार्यक्रमात बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, रमजान ईद हा एकात्मतेचा आणि सद्भावनेचा संदेश देणारा सोहळा आहे. महिनाभर उपवास करून अल्लाहची इबादत करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचा आणि समर्पणभावनेचा गौरव या निमित्ताने सर्वांनी साजरा केला पाहिजे. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रेम, बंधुत्व आणि सलोख्याचा संदेश देणे महत्त्वाचे आहे.जाहिरात
यावेळी मौलाना साहेबांनी प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत हिंदू आणि मुस्लिम समाज हे दोन डोळ्यांसारखे असल्याचे सांगितले. दोन्ही समाज एकत्र राहिल्यासच खरं ऐक्य निर्माण होईल आणि समाजात दूरदृष्टी ठेवून प्रगती केली जाईल. सर्व धर्म समभाव जपत प्रत्येक सण एकत्र साजरा करण्याची नैतिक जबाबदारी सर्वांची आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.जाहिरात
स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांपासून गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून ईद निमित्त इफ्तारचे आयोजन केले जात असून या वर्षी देखील विविध ठिकाणी इफ्तार पार्टी आणि मज्जितमध्ये फळांचे बॉक्स कोल्हे कुटुंबाकडून पाठविले गेले.यासह शीरखुर्मा पार्टीचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे सर्व समाजात सलोखा वाढतो, धार्मिक ऐक्य वृद्धिंगत होते आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. कोल्हे व काळे परिवाराने नेहमीच तालुक्यात शांतता, बंधुत्व आणि विकास जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
विवेकभैय्या कोल्हे यांनी पुढे सांगितले की, सण आणि उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी परस्पर सौहार्द वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोल्हे परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि येणारे दिवस आनंदाचे, सुखाचे व भरभराटीचे जावोत, अशी प्रार्थना करण्यात आली.