आपला जिल्हा

भाजपा पक्ष संघटन अधिक मजबूत करा – बाबा डमाळे पाटील

भाजपा पक्ष संघटन अधिक मजबूत करा – बाबा डमाळे पाटील

भाजपा पक्ष संघटन अधिक मजबूत करा – बाबा डमाळे पाटील

जाहिरात

मालेगाव विजय कापसे दि ९ एप्रिल २०२५- सध्या भाजप प्राथमिक सदस्य, सक्रिय सदस्य तसेच तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या निवड प्रक्रिया सुरू आहे.भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी सर्वांनी पुढाकाराने सोबत घेऊन सदस्य नोंदणी कार्यक्रम पूर्ण करावा भाजप जगातील एक नंबरचा राजकीय पक्ष असून याचा आपणास अभिमान ठेवावा असे प्रतिपादन मालेगाव- निमगाव पक्ष संघटना निवडणूक अधिकारी बाबासाहेब डमाळे पाटील यांनी केले.

जाहिरात

भाजप उपजिल्हाध्यक्ष दीपकराव देसले यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव येथे बैठक संपन्न झाली,याप्रसंगी डमाळे पाटील पुढे म्हणाले की, निमगाव मंडलात मागील पंचवार्षिक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुणाबरोबर युती नसतानाही स्वबळावर तीन जिल्हा परिषद सदस्य, तीन पंचायत समिती सदस्य,२५ सरपंच व १३० पेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत.भविष्यातही आपली युती कुणाबरोबर असेल किंवा नसेल हे आपणास आत्ताच सांगता येणार नाही मात्र आपलं संघटन अधिक भक्कमपणे उभे करून पक्ष संघटना मजबूत बांधणी करा, मी निवडणूक अधिकारी असलो तरी वरिष्ठांपर्यंत आपला अहवाल फक्त पाठविणे ही जबाबदारी माझी असून पक्षाची संघटनेची धुरा कोणाच्या खांद्यावरती येईल हे वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे.

जाहिरात

आपणावर असणारी पक्षाची जबाबदारी आपण सर्व समाजाला बरोबर घेऊन योग्य पद्धतीने पार करावी बुथ रचना, बुथ समिती भक्कमपणे उभी करावी ,तालुका मंडल गाव पदाधिकारी यांनी नवे -जुने पदाधिकारी यांना बरोबर घेऊन कार्य अधिक जोमाने उभे करावे. ज्याप्रमाणे आपण रामनवमी,शिवजयंती,भाजप पक्ष स्थापना दिन साजरा केला. त्याचप्रमाणे १४एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावा-गावात मोठ्या थाटात साजरी करावी असे शेवटी बाबा डमाळे पाटील म्हणाले. कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जाहिरात

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दीपकराव देसले, शिवाजी कराडे,वामनराव ढोणे,मोठा भाऊ शेलार,बाबाजी मोरे, अर्जुन शेलार, मीनाक्षीता हिरे, योगिता पाटील,कविता पगार, ललिता देसले,संजय हिरे,पिंटू ठाकरे,नानाभाऊ पवार, शिवाजी पवार, दादासाहेब सूर्यवंशी,रामचंद्र दुकळे,गणेश महाले,विनोद निकम,भूषण नरवाल,रणजीत शिंदे, भाऊसाहेब वाघ,तेजेंद्र कदम, मुरलीधर शेवाळे,भरत शेवाळे, बाळासाहेब मिस्कर,सुरेश काळे,प्रमोद शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार मंडलाध्यक्ष शिवाजी कराडे यांनी केले.

जाहिरात आत्मा

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे