हनुमान जन्मोत्सव २०२५ निमित्त शिर्डीत १२५ किलोचा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा संपन्न
हनुमान जन्मोत्सव २०२५ निमित्त शिर्डीत १२५ किलोचा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा संपन्न
हनुमान जन्मोत्सव २०२५ निमित्त शिर्डीत १२५ किलोचा बजरंग गोटा उचलणे स्पर्धा संपन्न

शिर्डी विजय कापसे दि १३ एप्रिल २०२५-क्रांती युवक मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलणे व जोर काढण्याच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. शिर्डीत दक्षिणमुखी हनुमान मंदिर असून या मंदिरात श्री साईबाबा जात असत व सदर मंदिराचा श्री साईबाबांनी जीर्णोद्धार केलेला आहे. त्यामुळे या हनुमान मंदिराला विशेष महत्त्व आहे.

या मंदिरात क्रांती युवक मंडळ गेल्या २८ वर्षापासून हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करतात. या सर्व धार्मिक कार्यक्रमासह १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली मोठा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला या बजरंग गोट्याचे विधिवत पूजन शिर्डीतील वंदे मातरम संघटनेचे रमेशजी शेळके व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते पार पडला. सदर स्पर्धत एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच २२ युवकांनी हा १२५ किलोचा बजरंग गोठा उचलण्याचा मान प्राप्त केला. या सर्वांना सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे पारंपरिक व्यायामाची पद्धत म्हणजे जोर मारणे ही लोक पावत असलेली व्यायामाची पद्धती तरुणांना पुन्हा एकदा आत्मसात व्हावी म्हणून भव्य जोर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये तब्बल सत्तर युवकांनी सहभाग नोंदवला. तसेच त्यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आली. ही सर्व बक्षीस रवींद्र कोते अजित पारख ,बापू काळे ,राहुल गोदकर व प्रतिक शेळके यांच्या शुभहस्ते देण्यात आली तसेच सायंकाळी श्रींचे शस्त्र असलेले चांदीची गदा यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हनुमान महाआरती तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सुरेंद्र महाले, सचिन तांबे, विशाल कोळपकर, विराट पुरोहित, महेश वैद्य संतोष तांबे आकाश त्रिपाठी ललित शेळके बबलू वरपे जतिन जैन, आतिक पठाण, योगेश मोटवानी रितेश भालेराव संदेश रत्नपारखी आकाश वाडेकर शुभम ताम्हाणे, सागर परदेशी शुभम नाणेकर किरण परदेशी राहुल हजारे आर्यन्तेजी आदित्य वारुळे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
शिर्डीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे.माझ्यासह तब्बल २३ युवकांनी शक्ती व युक्ती वापरून १२५ किलो वजनाचा बजरंग गोटा उचलला तसेच जिमच्या युगात पारंपारिक जोर स्पर्धेला देखील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्व तरुणांनी आज शक्तीची व बलाची उपासना केली
पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी होतील.
सचिन तांबे
मा. विश्वस्त श्री साईबाबा संस्थान





