आपला जिल्हा

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारले तर जीवन समृद्ध होईल- हनुमंतराव भोंगळे 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारले तर जीवन समृद्ध होईल- हनुमंतराव भोंगळे 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारले तर जीवन समृद्ध होईल- हनुमंतराव भोंगळे 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ एप्रिल २०२५महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समतेचा विचार रुजवला. मानवी कल्याणासाठी त्यांनी शिक्षणाबरोबरच संघटनेचा आणी संघर्षाचा मोलाचा उपदेश केला असे प्रतिपादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांनी जेऊर कुंभारी संजयनगर येथील भीम साम्राज्य सेना आयोजित १३४ व्या भिमजयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना ते पुढे म्हणाले की भिमजयंती साजरी करत असताना वैचारिक जागृती होणे गरजेचे आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने मानवी जीवनात समृद्धी येईल.

जाहिरात

या वेळी माजी सभापती शिवाजी वक्ते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये व कार्यात माता रमाबाई आंबेडकर यांचा खूप मोठा वाटा आहे. माता रमाई यांनी भक्कम पाठबळ दिले म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशाच्या प्रगतीत, सामाजिक कार्यात अतुलनीय योगदान देता आले. भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजामधील जात भीत नष्ट करून सर्वांनी एकोप्याने राहावे हा मोलाचा संदेश यानिमित्ताने दिला तसेच विवेक भैय्या कोल्हे सामाजीक कामाचे आदर्श तरूणांनी घेतला पाहीजे असे सांगितले. सदर कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात तसेच तालुका अध्यक्ष अनिल भाऊ रननवरे यांनी देखील भेट देत संघटनेच्या कार्यकर्त्यांची कौतुक केले.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे,संघटनेचे मार्गदर्शक भास्कर वाकोडे, महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, विजय रोहम,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जालिंदर चव्हाण आदींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात प्रथम उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

जाहिरात

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे  तर स्वागताध्यक्ष आर पी आय चे प्रदेश सचिव तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन भिम सम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदीप गायकवाड यांनी केले.
यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरा, माजी सभापती शिवाजी वक्ते,न्यू इंडिया इन्शुरन्स मॅनेजर भिमराज वक्ते,आर पीआय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड,महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते,संचालक सतिष आव्हाड, संचालक संजय दौलतराव होन, संचालक मधुकर वक्ते, विजय रोहम,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जालिंदर चव्हाण, गौतम बँकेचे संचालक बापूराव वक्ते, महेंद्र वक्ते, कल्याणराव गुरसळ, आनंदा चव्हाण, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, संजय वक्ते, यशवंतराव आव्हाड, किशोर गायकवाड,किरण गायकवाड,भानुदास वक्ते,कोंडीराम वक्ते, सुनिल वक्ते,किरण पाटीलबा वक्ते ,पत्रकार बिपीन गायकवाड, अशोक राऊत,तुषार गुरसळ, विशाल गुरसळ यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ व भीमसैनिक यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी कोपरगाव समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकास सलामी देण्यात आली कार्यक्रमानंतर भीम साम्राज्य सेनेच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सायंकाळी भीम प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमसाम्राज्य सेना अध्यक्ष सागर गायकवाड, कार्याध्यक्ष सुमित पगारे,उपाध्यक्ष दावीद धीवर, सागर जगताप,स्वप्निल भालेराव, सचिन गायकवाड , निलेश शिंदे ,रवी पवार, सचिन गायकवाड,अवी पगारे,राहुल गायकवाड,बाबू शिंदे,पप्पू गायकवाड,आकाश पगारे, अमोल जगताप गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रदीप गायकवाड यांनी केले तर आभार सागर गायकवाड यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे