ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक व धार्मिक उपक्रमाने साजरा
ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक व धार्मिक उपक्रमाने साजरा
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २९ जुलै २०२५– राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा २७ जुलै रोजी असलेला वाढदिवस कोपरगाव युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
जाहिरात
युवा सेनेचे कोपरगाव शहर प्रमुख पै. गगन हाडा यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी कुंभारी येथील अत्यंत प्राचीन राघवेश्वर महादेवास पंचामृत अभिषेक, कुंभारी येथील गो शाळेतील जनावरांना चारा वाटप, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्ण व नातेवाईकांना फळ व राजगिरा लाडूचे वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निष्ठान चे वाटप तसेच कुंभारी परिसरातील गरजु कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला.जाहिरात
या अभिनव उपक्रम प्रसंगी युवा सेनेचे शहर प्रमुख पै. गगन हाडा माजी शहरप्रमुख भरत मोरे, निखिल कंक्राळे, पै.कान्हा हाडा, राहुल हाडा, पीयूष सैंदाने, वैभव शेलार, पै.चिराग हाडा, चेतन हाडा, विनय टाक, हर्ष हाडा, युवराज हाडा, समीर पटवेकर, मंगेश जगताप, याकूब शेख, करण पाटोळे, रियान शेख, रितेश वाघिले, दिनेश मरसाळे, आशू शेख, सोनू साबळे सुमित राकपसरे दिपेश वाघमारे आदी शिवसेना युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.