आपला जिल्हा

नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या
 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या
 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कोपरगाव विजय कापसे दि १९ मे २०२५महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित, नामदेवराव परजणे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, संवत्सर येथील बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यानी याही वर्षी उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.

जाहिरात

प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित, नामदेवराव परजणे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.८७ % लागला असून यामध्ये विज्ञान शाखेतून  कानडी कोमल अरुण हिने ७१.१७ % गुण मिळवून विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तर  जगताप अदिती योगेश – ६७.१७ % व  वाडेकर स्मिता दादासाहेब –६४.१७ % गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेतील  खिलारी वैशाली कचेश्वर व पठाण परवेज इसरारखान – ६९.३३ %,  लोहकरे देवयानी सुनिल– ६६.३३ % , मैंद पूजा संजय – ६४.८३ % गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले.

जाहिरात

कला शाखेतील  खटकाळे पायल संजय – ७१.१७ %,  रांधवणे दिपाली रवींद्र – ६४.३३ % ,  कुवर अंजली बाजीराव व गायधने सुजाता भिकाजी – ६०.०० % गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले.
महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधा व प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना केलेले योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन करण्यात आले अशी प्रतिक्रिया गुणवंत विद्यार्थ्यानी व्यक्त केली.गुणवंत विद्यार्थ्यांचे गोदावरी दूध संघाचे चेअरमन  राजेश परजणे,  चंद्रकांत लोखंडे,  लक्ष्मणराव साबळे,  लक्ष्मणराव परजणे, उपसरपंच विवेक कृष्णराव परजणे,  बापू तिरमखे या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर विद्यार्थ्यांना  राजेश परजणे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. चिंधे एस.बी. यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सदाफळ वाय. आर. यांनी केले.

जाहिरात

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल  नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मा.जि.प.अध्यक्षा  शालिनीताई विखे पाटील, गोदावरी दुध संघाचे चेअरमन व महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी  राजेश परजणे पाटील, माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, उपसरपंच विवेक कृष्णराव परजणे, संस्थेच्या सचिव मीरा काकडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज सदाफळ तसेच पालक यांनी अभिनंदन केले.

जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे