आपला जिल्हा
नागरिकांनो डोंगरांना आग लावू नका ; वनसंपदा जपा – दुर्गाताई तांबे

नागरिकांनो डोंगरांना आग लावू नका ; वनसंपदा जपा – दुर्गाताई तांबे

संगमनेर विजय कापसे दि २४ फेब्रुवारी २०२६– उन्हाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी डोंगरांना आगी लावल्या जातात. यामुळे विविध वृक्षांसह नैसर्गिक वनसंपदेची मोठी हानी होत असते. वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून कोणीही डोंगरांना आगी लावू नका उलट चुकून वनवा लागल्यास तात्काळ वन विभाग व ग्रामपंचायत कार्यालयास कळवा. आपल्या वनसंपदेची काळजी घ्या असे आवाहन संगमनेरच्या मा.नगराध्यक्ष तथा दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.










