महिलेच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करा
सकल आंबेडकरी समाजाची मोर्चा काढत मागणी

कोपरगाव विजय कापसे दि १० जुन २०२५ शस्त्रक्रिया करतांना हलगर्जीपणा केल्याने अर्चना माधव शिंगाडे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल कोपरगाव शहरातील डॉ मयूर त्रिरमखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणी साठी कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात मृत महिलेचे पती माधव प्रभाकर शिंगाडे राहणार ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव यांनी म्हटले आहे की, माझी पत्नी अर्चना माधव शिंगाडे ही तीन महिन्याच्या गरोदर असताना त्यांची ट्रीटमेंट कोपरगाव शहरातील डॉ तिरमखे यांच्या कडे चालू होती दि २२ मे २०२५ रोजी नियमित तपासणी साठी ती त्यांचा कडे गेली असता डॉक्टरांनी सोनोग्राफी करत गर्भाची वाढ व्यवस्थित झाली नाही व गर्भवाढीसाठी २० दिवसाच्या गोळया दिल्या सदर गोळ्या घेतल्या नंतर दि २४ मे २०२५ रोजी तिला रक्त स्त्राव चालु झाला व पोटात दुखायला लागले असता दि २५/ल मे २०२५ रोजी सकाळी पुन्हा डॉ तिरमखे यांच्याडे तपासणीस नेले असता डॉ तिरमखे यांनी पुन्हा सोनोग्राफि केली असता गर्भाच्या भोवती रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे व गर्भ खराब झाला असून तो गर्भ काढावा लागेल असे सांगितले. गर्भ खराब झाल्यामुळे आम्ही सहमती दिली गर्भ काढल्यानंतर तिच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या रक्तस्राव देखील खूप होत होता.

परंतु डॉक्टर मयूर तिरमखे यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी इलाज करण्यास हलगर्जीपणा केला. आम्ही वारंवार सांगून ऐकले नाही व त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि २६ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सोनोग्राफी पुन्हा केली. तो रिपोर्ट डॉक्टर तिरमखे यांना दाखवला रिपोर्ट नॉर्मल आहे असे सांगून घरी जाण्यास सांगितले परंतु तिला त्रास कमी झाला नाही ते म्हणाले पोटात जे दुखतंय ते वेगळे आहे. आणि गर्भात ही वेगळं हे सांगितले असता त्यानंतर आम्ही कोपरगाव येथील डॉक्टर फडके यांच्याकडे गेलो असता त्यांनी औषध उपचार चालू केला तेव्हा डॉक्टर फडके यांनी तपासणी केली असता पोटात सेप्टिक झाले आहे.





