काळे गट

लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके बिनविरोध

 लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके बिनविरोध

लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके बिनविरोध

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० जुन २०२५कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल खंडीझोड यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण साहेबराव शेळके यांची बिनविरोध करण्यात आली आहे.

जाहिरात गौतम

लौकी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच अजिनाथ खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत किरण साहेबराव शेळके यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक संकेत शिगांडे यांनी किरण शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सरपंच, सर्व सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच किरण शेळके यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मावळते उपसरपंच राहुल खंडीझोडसदस्य सौ.कांताबाई खिल्लारीसौ.दिपाली खटकाळेसौ.ललिता इंगळेअनिल आहेरजिनींग प्रेसिग सोसायटीचे संचालक शिवाजीराव शेळके,राजेंद्र खिलारी,सावळेराम खटकाळे,भाऊसाहेब भवर,दिगंबर जाधव,बबनराव भवर,सागर खटकाळे, विष्णु खटकाळेबाळासाहेब भवररामभाऊ खटकाळेभागीनाथ शेळकेआबासाहेब जाधवभाऊसाहेब गोडसेकैलास शेळकेअनिल भव सतिष खटकाळेनारायणराव  शेळके आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व लौकी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

नवनिर्वाचित उपसरपंच किरण शेळके यांचे मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.उपसरपंचपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच किरण शेळके यांनी आ.आशुतोष काळे आभार मानले आहे. ज्या विश्वासाने माझ्यावर उपसरपंचपदाची जबाबदारी सोपविली त्या विश्वासाला तडा जावू न देता सरपंच, सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून लौकी ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवू व टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जाहिरात
लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण शेळके यांची निवड होताच सरपंच, सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे