कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळीत वह्यांचे वाटप
कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळीत वह्यांचे वाटप
कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळीत वह्यांचे वाटप

कोपरगाव विजय कापसे दि १३ जुलै २०२५– कोपरगाव तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असलेले संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या २१ जून रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हितचिंतक मित्र परिवाराने वृक्षारोपणशालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदि वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांचा वाढदिवस साजरा केला.

याच दिनाचे औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक १२ जुलै रोजी सुमारे ९०० शालेय वह्यांचे वाटप करत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, उपसरपंच संजय देवकर, चंद्रकांत देवकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप अण्णासाहेब देवकर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्नेहल गायकवाड , मुख्याध्यापिका कांता देवकर आदी सह शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद रणधीर यांनी तर उपस्थितांचे आभार उपसरपंच संजय देवकर यांनी व्यक्त केले.



