आपला जिल्हा

कोपरगावात झाड पडण्याच्या घटनेचेही राजकारण, स्थानिक व्यावसायिकांनी काळे गटाला सुनावले खडेबोल

कोपरगावात झाड पडण्याच्या घटनेचेही राजकारण, स्थानिक व्यावसायिकांनी काळे गटाला सुनावले खडेबोल
कोपरगावात झाड पडण्याच्या घटनेचेही राजकारण, स्थानिक व्यावसायिकांनी काळे गटाला सुनावले खडेबोल
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ जुलै २०२६कोपरगाव शहरात एक झाड अचानक कोसळल्याने या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पडलेले झाड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा त्वरित कार्यरत करण्यात आली.नगरपरिषदेची अत्याधुनिक गोरखा गाडीही घटनास्थळी पोहोचविण्यात आली होती. झाडाचा आकार मोठा असल्याने ते सुरक्षितपणे हटवण्यासाठी क्रेनचीही मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली होती.

जाहिरात
दरम्यान, या नैसर्गिक घटनेवरून काही राष्ट्रवादी पक्षाच्या काही व्यक्तींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिक दुकानदारांनी झाड पडल्याची माहिती नगरपरिषद प्रशासन तसेच नगराध्यक्षांना दिल्यानंतर तातडीने यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि झाड हटविण्याचे काम सुरू झाले होते. अधिकाऱ्यांनी क्रेन मागवले होते ते येण्यापूर्वीच प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात न घेता काही जणांनी या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जाहिरात
या संदर्भात स्थानिक व्यावसायिक निसार शेख यांनी परखड भूमिका मांडत अशा प्रवृत्तीवर तीव्र शब्दांत टीका केली. नैसर्गिक आपत्ती किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित घटनांमध्ये राजकारण करण्याऐवजी प्रशासनाला सहकार्य करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याऐवजी प्रसिद्धीसाठी आरोप-प्रत्यारोप करणे ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जाहिरात
शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असताना प्रत्येक घटनेत राजकीय रंग देण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अशा घटनांमध्ये प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे स्वागत करत, अनावश्यक राजकारण टाळून सकारात्मक सहकार्याची भूमिका घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे