आपला जिल्हा

कोपरगाव करांसाठी खास डिजिटल उपक्रम; बारकोड द्वारे नोंदवू शकता तक्रारी-मंदार पहाडे

कोपरगाव करांसाठी खास डिजिटल उपक्रम; बारकोड द्वारे नोंदवू शकता तक्रारी-मंदार पहाडे
आ. आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक मंदार पहाडे यांच्या संकल्पनेतून कोपरगावकरांसाठी खास डिजिटल उपक्रम…

कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑगस्ट २०२५कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ आणि प्रभावीरीत्या सोडवण्यासाठी माजी नगरसेवक मंदार पहाडे यांच्या संकल्पनेतून प्रयत्नातून एक अभिनव डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दि ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

जाहिरात
या उपक्रमांतर्गत नागरिकांना आता आपल्या नगरपालिका संदर्भातील तक्रारी, अडचणी सूचना केवळ एक QR कोड स्कॅन केल्यावर संबंधित लिंकवर जाऊन तक्रार नोंदवता येईल. समस्या नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन, सोपी व पारदर्शक असून नागरिकांच्या वेळेचीही बचत होणार असल्याचे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी सांगितले.
जाहिरात

या उपक्रमाबद्दल बोलताना आमदार आशुतोष दादा काळे म्हणाले, “नागरिकांची कामे सोपी करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. वाढदिवस साजरा करताना जनतेच्या सेवेसाठी काहीतरी नवीन आणि उपयुक्त देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो.”

जाहिरात
शहरातील विविध भागांत QR कोडचे फलक लावण्यात येत असून नागरिकांना मोबाईलच्या सहाय्याने कोड स्कॅन करून तक्रारी नोंदवता येणार आहेत. प्रशासनाकडून या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी सुरू केलेला हा डिजिटल उपक्रम कोपरगाव शहरासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून नागरिकांच्या सहभागानेच त्याचे यश निश्चित होणार आहे.यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या डिजिटल प्रणालीचे सर्व नागरिकांनी स्वागत करत त्यांचे कौतुक केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे