हरिनाम सप्ताह निमित्त डाऊच मध्ये “एक पेड माँ के नाम” उपक्रम
हरिनाम सप्ताह निमित्त डाऊच मध्ये “एक पेड माँ के नाम” उपक्रम
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ७ ऑगस्ट २०२५– कोपरगाव तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत डाऊच बु.येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी (दि.६) महंत गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक-नेवासेकरे यांचे काल्याचे किर्तनाने झाली. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा, भजन, सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री ७ ते ९ या वेळेत किर्तन सेवा त्यानंतर ग्रामपंचायत डाऊच बु.च्या वतीने अनोखा उपक्रम राबवत -“एक पेड माँ के नाम” अंतर्गत दररोजच्या किर्तनकार महाराजांच्या “आई” च्या नावे “एक फळझाड लागवड करणे, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यांत आलेले होते.
जाहिरात
अखंड हरिनाम सप्ताह-समारोप प्रसंगी स्मार्ट ग्राम डाऊच बु. चे ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह माधवराव पाटील यांनी त्यांचा “आईच्या स्मरणार्थ” गावासाठी ११ हजार १११ रुपये रोख स्वरूपात देणगी देऊन गावाप्रती असलेली आपली निष्ठा जोपासली. संपूर्ण गावांत २०० नारळाच्या झाडांची लागवड करण्यांत आली. तसेच चिकू, सिताफळ, पेरू व इतर फळझाडांची देखील लागवड करण्यांत आली. तर काल्याच्या किर्तनाला आलेल्या सर्व भाविक भक्तांना एक झाड वाटप करत बिहार पॅटर्न अंतर्गत १ हजार झाडांची नव्याने लागवड करण्यांत आली.जाहिरात
सदर कार्यक्रमासाठी पंचायत समिती कोपरगांवचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचे शुभहस्ते गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत चिकू, सिताफळाचे झाड लावून वृक्षारोपण केले. तसेच ह. भ. प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक-नेवासेकर यांचे काल्याचे किर्तनानंतर ग्रामपंचायती मार्फत एक फळझाड लावून वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यांत आला या प्रसंगी कोपरगांव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दिपक राठे, कृषी अधिकारी सचिन कोष्टी, विस्तार आधिकारी बबनराव वाघमोडे, ग्रामपंचायत अधिकारी संजय दुशिंग, सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच संजय ढमाले, जेष्ठ सदस्य भिवराव दहे, सुनिल बढे, या सह सर्व सप्ताह कमिटी सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.