डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यालयात रक्तातील हिमोग्लोबिन व रक्तागट तपासणी शिबिर संपन्न
डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यालयात रक्तातील हिमोग्लोबिन व रक्तागट तपासणी शिबिर संपन्न
डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यालयात रक्तातील हिमोग्लोबिन व रक्तागट तपासणी शिबिर संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५–संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रमुख अमित दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महिला सक्षमीकरण विभागातर्फे कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयत विद्यार्थिनींच्या रक्तातील हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या तपासणी शिबिराचे उद्घाटन संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनालीताई कोल्हे यांच्या हस्ते व डॉ.सरिता भुतडा विद्यालयाच्या प्राचार्या अनिता धनक ,उपप्राचार्या उज्वला म्हस्के, पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे ,पर्यवेक्षिका सुनीता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मनालीताई कोल्हे यांनी विद्यार्थिनींच्या शैक्षणिक जीवनात निरोगी आरोग्याचे महत्त्व सांगून मन व शरीर निरोगी असेल तर अभ्यासात मन लागते व शैक्षणिक प्रगती साधता येते असे सांगितले. अभ्यास करून मोठे व्हा आत्मनिर्भर बना तसेच विकसीत भारत निर्माण करण्यासाठी योगदान दया असे मार्गदर्शन केले.
डॉ.सरिता भुतडा यांनी आपल्या भाषणातून निरोगी आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम योगा यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थिनींनी आपल्या चांगल्या व निरोगी आरोग्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.शारीरिक व मानसीक आरोग्यासाठी तनावमुक्त रहा तसेच स्वच्छतेकडे लक्ष असे सांगितले. शिबिरात विद्यालयातील विद्यार्थिनींचे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक ललित जगताप व आभार कविता निकम यांनी मानले.



