आपला जिल्हा

संगमनेर तालुका कुटुंबाप्रमाणे सांभाळला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुका कुटुंबाप्रमाणे सांभाळला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखाना येथे २६ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १ जुन २०२६सेवानिवृत्ती हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेथून पुढे जेवणाचा आणखी एक टप्पा सुरू होतो. सर्वांनी चांगले आरोग्य ठेवणे गरजेचे असून तालुक्याची समृद्ध विचारधारा जोपासली पाहिजे. सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रगण्य बनवला आहे . गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करताना हा तालुका कुटुंबाप्रमाणे सांभाळाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा मा महसूल व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये 26 कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी पांडुरंग पाटील घुले हे होते. तर व्यासपीठावर राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संचालक संपतराव गोडगे ,नवनाथ आरगडे, विनोद हासे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, विजय राहणे ,विलास शिंदे, मीनानाथ वर्पे, गुलाबराव देशमुख ,रावसाहेब दुबे, दिलीप नागरे, सौ लताताई गायकर, सुनील राऊत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे कृष्णा दिघे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

या याप्रसंगी बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला समृद्ध नेतृत्वाची परंपरा लाभली आहे ही परंपरा आपण कायम जपली राजकारणाची एक चांगली संस्कृती निर्माण केली. जनतेने दिलेल्या संधीचा चांगला उपयोग करून सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या. तालुका शिक्षण सहकार आर्थिक समृद्धी ग्रामीण विकास दूध शेती शांतता सुव्यवस्था अशा सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य बनवला.

राज्यामध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवला. निळवंडे धरण कालव्यांसह पूर्ण केले. संगमनेर तालुक्याचा सहकार अत्यंत चांगला असून कारखान्याने सभासद शेतकरी याबरोबर कामगारांचे हित जोपासले. कायम वेळेत पगार दिले

जाहिरात

अनेक कामगारांची मुली उच्च पदावर काम करत असून सर्वांची कुटुंब समृद्ध झाली आहे. संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे आपण कायम एका कुटुंबाप्रमाणे हा तालुका सांभाळाला असून यापुढेही आपल्याला हा तालुका जपायचा असल्याचे ते म्हणाले.

याचबरोबर देशात व राज्यात जातीपातीचे राजकारण, धार्मिक ध्रुवीकरण केले जात असून सध्याची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट आहे महागाई व बेरोजगारी वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही.डिझेल पेट्रोलचे वाढलेले भाव हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत अवघड विषय ठरले असल्याचे ते म्हणाले

तर व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांच्या स्मारकाकरता तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या मागणी करून वेल्हाळे परिसरामध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचा अमृत मंथन अमृत गाथा हे पुस्तक, शाल बुके व आंब्याचे रोप देऊन कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपले मनोगती व्यक्त केली काहींना अश्रू आवडता आले नाही.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले यावेळी विविध कर्मचारी अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व स्नेह परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बहुउद्देशीय सभागृहाची सुरुवात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हक्काची जागा असावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतेश्वर मंदिराच्या शेजारी द्विमजली इमारत बांधण्यात येणार आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांंबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र येण्यासाठी व त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्यदायी व इतर सेवाभावी योजनांसाठी हे ठिकाण असणार आहे. या बहुउद्देशीय इमारतीचा पायाभरणी शुभारंभ आज मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे