सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये सी.ई.टी. मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये सी.ई.टी. मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये सी.ई.टी. मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
संगमनेर प्रतिनिधी दि २० जुलै २०२४–संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रमांचे आयोजन केले जाते. सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन मा. आ. डॉ. सुधीरजी तांबे साहेब यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने निफाड व चांदवड येथील अचिव्हर्स अकॅडमीचे करियर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. एम.एच.टी-सी.ई.टी., जेइइ, नीट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेनंतर कोणकोणत्या शाखेमध्ये प्रवेश मिळू शकतो याची माहिती या प्रसंगी देण्यात आली.
या प्रसंगी अचिव्हर्स अकॅडमीचे संचालक रोशन लोखंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात ध्येय गाठण्यासाठी योग्य प्लॅनिंग करा. नियमित अभ्यास करत आयुष्यात नक्कीच यश प्राप्त करता येते असे सांगितले. तर समवेत उपस्थित असणारे वैभव लोखंडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या सहाय्याने बारावी नंतरच्या विविध स्पर्धा परीक्षा त्यांचे शेड्युल पेपर पॅटर्न मार्किंग स्कीम आपल्याला कुठे ऍडमिशन मिळू शकते याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
रजिस्ट्रार बाबुराव गवांदे यांनी विविध उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी ठरवलं तर आपली स्वप्न सत्यात उतरवन कधीही अशक्य नाही विद्यार्थी हा नेहमीच यशाच्या शोधात असला पाहिजे असा मुलमंत्र त्यांनी दिला. संस्थेचे सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर सर , कॉलेजचे प्राचार्य के. जी खेमनर कार्यक्रमप्रसंगी आवर्जून उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे यांनी प्रास्तविक पर मनोगत व्यक्त करत सायन्स शाखेच्या उपक्रमांबद्दल माहिती करुन दिली. प्रा. सुरेश घोरपडे यांनी सह्याद्री मध्ये सुरु असणार्या डायमंड बॅच विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. डायमंड बॅच शिकवणारे सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुलकर्णी मॅडम यांनी केले तर आभार प्रा. माळवे सर यांनी मांडले.