शनिवारी खा. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत अरुण पाटील कडू यांचा अभिष्टचिंतन सोहळा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार

अहिल्यानगर विजय कापसे दि २८ ऑगस्ट २०२५– अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ नेते तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कडू यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वा. सहकार सभागृह अहिल्यानगर येथे देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती निमंत्रक मा. आ. डॉ सुधीर तांबे यांनी दिली आहे.

अरुण पुंजाजी पाटील कडू अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती देताना मा. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम करताना अरुण पाटील कडू यांनी प्रत्येक तालुक्यात रचनात्मक कामांची उभारणी केली आहे. याच बरोबर आयुष्यभर शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने काम करताना रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून त्यांच्या 75 वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहांमध्ये त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात भूषविणार असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतरावजी गडाख, खासदार निलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील विधान परिषद सभापती नामदार प्रा. राम शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे ,आमदार रोहित पवार, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, आमदार डॉ किरण लहामटे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत उगले, आमदार विठ्ठल लंघे, आमदार विक्रमसिंग पाचपुते, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, माजी आमदार शंकरराव गडाख ,माजी आमदार भानुदास मुरकुटे ,माजी खासदार सदाशिव लोखंडे ,माजी आमदार आप्पासाहेब राजळे, माजी आमदार नरेंद्र पाटील घुले ,राजेंद्र फाळके, बिपिन दादा कोल्हे ,बबनराव पाचपुते ,प्राजक तनपुरे ,बाबासाहेब भोस, विजयराव औटी ,चंद्रशेखर घुले, डॉ एस एन.पठाण, अशोकराव काळे, चंद्रशेखर कदम, प्राचार्य शिवाजीराव भोर, पांडुरंग अभंग, राहुल जगताप, बाळासाहेब मोठे,भाऊसाहेब कांबळे, डॉ .सर्जेराव निमसे, गीतांजलीताई शेळके ,संभाजीराव फाटके, कॉम्रेड सुभाष लांडे ,माजी आमदार वैभव पिचड ,बाळासाहेब मुरकुटे, अशोकराव गायकवाड, फिरोज भाई तांबटकर नंदकुमार झावरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक महिला कार्यकर्ते व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे व अरुण पाटील कडू अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संघर्ष यात्री पुस्तकाचे प्रकाशन
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देताना सातत्याने सामाजिक बांधिलकी ठेवून पुरोगामी विचार जपणारे अरुण पाटील कडू यांच्या 75 निमित्त राज्यभरातील विविध मान्यवरांच्या 75 लेखांचा संघर्ष यात्री या गौरव ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी होणार आहे.



