आपला जिल्हा

करंजीतून आंदोलन स्थळी शिदोरी घेऊन गावकरी रवाना 

करंजीतून आंदोलन स्थळी शिदोरी घेऊन गावकरी रवाना 
मुस्लिम बांधवांनी स्वयंस्फूर्तीने दिला मदतीचा हात
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ सप्टेंबर २०२५गेल्या दोन दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू केले असून या आंदोलनास संबंध राज्यभरात अत्यंत मोठा प्रतिसाद मिळत असून लाखो मराठा बांधव त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत दाखल झाले आहे परंतु मुंबईतील बहुतांश हॉटेल, दुकाने तसेच अनेक सामाजिक अन्नछत्रे बंद असल्याने मराठा बांधवांची जेवणाची व पाण्याची मोठी परवड होत असताना राज्यभरातून  गावा-गावातील मराठा बांधव शिदोरी जमा करत मुंबईच्या दिशेने कूच करत आहे असल्याचे पहावयास मिळत आहे.

जाहिरात
याच उद्देशाने  कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मराठा युवकांनी एकत्रित येत सोशल मीडियाच्या माध्यमातून शिदोरी जमा करण्याचे आवाहन केले असता त्यांच्या या आवाहनाला करंजी, ओगदी, आंचलगाव, बोलकी आदी गावच्या ग्रामस्थांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात भाकरी, चपाती,लोणचं, चटणी पाणी बॉटल, बिस्किट, चिवडा आदि खाण्याचे साहित्य जमा केले असून हे सर्व साहित्य गावातील अतुल भिंगारे, गोकुळ जाधव,राहुल आढाव, योगेश शिंदे, हर्षल आगवन, साईनाथ भिंगारे, लखन घाटे, रोहित शेळके, बाळू दाभाडे आदी युवक मुंबईच्या दिशेने निघाले आहे

जाहिरात
सर्वधर्मसमभाव अंगीकारत गावातील मुस्लिम बांधवांनी देखील मराठा आंदोलकांना शिदोरीसाठी मोठ्या प्रमाणात मदत केली असून त्याबद्दल मराठा बांधवांनी त्यांचे देखील आभार व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे