आपला जिल्हा

शिर्डी विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव केला साजरा 

शिर्डी विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव केला साजरा 

शिर्डी विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव केला साजरा 

जाहिरात

लोणी विजय कापसे दि २ सप्टेंबर २०२५लोणीचे सुपूत्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आंदोलनात सरकार आणि आंदोलक यांच्यात यशस्वी मध्यस्थी करून मिळवलेल्या यशाचा आनंद शिर्डी विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

जाहिरात

मागील चार दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष फक्त मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्री विखे पाटील यांच्या राॅयल स्टोन बंगल्याकडे होते.एकीकडे आझाद मैदानावरील आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच दुसरीकडे मंत्री विखे पाटील यांच्या बंगल्यावर बैठकांची धावपळ वाढतांना दिसून आली.

जाहिरात

मंत्री विखे पाटील यांनी यासर्व संकटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपसमितीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठका आणि त्यामध्ये अभ्यासपूर्ण पध्दतीने जरांगे यांच्या प्रत्येक मागणीला दिलेल्या सकारत्मक प्रतिसादामुळे सरकार समोरील मोठा पेच सोडविण्यात विखे पाटील यांना मोठे यश आले आहे.

तालुक्याच्या भूमीपुत्राने केलेल्या कर्तबगारीचा आंदोत्सव विविध गावात ग्रामस्थांनी फटाके फोडून केला.मंत्री विखे पाटील यांचे सर्वानी अभिनंदन करून मराठा समाजला मिळवून दिलेल्या न्याया बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

यापुर्वी मंत्री विखे पाटील यांनी मराठा संघटनाचे पदाधिकारी अभ्यासक आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून लोणीत वेळोवेळी बैठका घेतल्या.कोव्हीड संकटात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील मराठा ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्याना पन्नास टक्के फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.असा निर्णय करणारे राज्यात ते एकमेव नेते ठरले.

ना विखे पाटील

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे