शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक
शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक
शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

कोपरगाव विजय कापसे दि ९ सप्टेंबर २०२५– गेल्या महिन्यात दिनांक २४ ऑगस्ट रोजी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव फाटा परिसरात दुचाकीवरून कोपरगाव कडे जाणाऱ्या एकाच अडवून तिघा जणांनी मारहाण केली होती. या घटनेत त्याच्याजवळील पंधरा हजार रुपये रोख रक्कम, दुचाकीची चावी घेऊन हल्लेखोर पसार झाले होते. वावी पोलिसांनी या प्रकरणात तिघा जणांना अटक केली असून त्यांनी सदर दुचाकीस्वारास मारहाण केल्याची कबुली दिली आहे.

सुधाकर वक्ते वय ३५ हे वावी येथे गेल्या वीस वर्षांपासून पॅथॉलॉजिकल लॅब चालवतात. मारहाणीची घटना घडली त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घरी जात असताना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकी वरून आलेल्या चौघाजणांनी वक्ते यांना मिरगाव फाटा परिसरात दुचाकी आडवी मारून थांबण्यास भाग पाडले. त्यांना लाथा बुक्क्यांनी व हातातील दांड्याने मारहाण करत खिशातील १५ हजार रुपये व दुचाकीची चावी हिसकावून घेतली. मारहाण करणारे त्यांच्या दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने पसार झाले होते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोठावळे, तपास अंमलदार अमोल गोडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास करून शुक्रवारी रात्री तिघांना अटक केली.

महेश बाबुराव सोळके (24) मुळ राहणार जेऊर कुभारी, ता. कोपरगाव, सध्या राहणार धात्रक फाटा, नाशिक. धीरज नंदकिशोर गुंडगळ (24) राहणार हरीदर्शन अपार्टमेंट, वृंदावन कॉलनी, जत्रा हॉटेल, नाशिक. भागवत भारत बांगर (25) मुळ राहणार लोखंडे वस्ती वडवणी जि. बीङ सध्या राहणार धात्रक फाटा के. के वाघ कॉलेज जवळ नाशिक अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांचा चौथा साथीदार अमर राकेश वळवी राहणार करंजवेळ, ता.नवापूर सध्या राहणार – जत्रा हॉटेल, नाशिक हा फरार आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी देखील ताब्यात घेतल्या. अटक करून तिघांनाही पोलिसांनी सिन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.



