आपला जिल्हा

आरजेएस महाविद्यालयात जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहात साजरा

आरजेएस महाविद्यालयात जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहात साजरा
आरजेएस महाविद्यालयात जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १२ सप्टेंबर २०२५:- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी महाविद्यालयात ८ सप्टेंबर रोजी जागतिक फिजियोथेरपी दिन साजरा करण्यात आला.

जाहिरात
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण उपक्रमाने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने वातावरण भक्तीमय झाले.स्पर्धा रिल्स, फिजियो  टॅक,अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञान व सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.तसेच रॅप वॉकद्वारे पॅथॉलॉजिकल गेट पॅटर्न व विकृतीचे प्रात्यक्षिक प्रेक्षकांना प्रेरणादायी ठरले.

जाहिरात
सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयात साडेचार वर्षाचा BPT ( बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ) अभ्यासक्रम चालतो तसेच २०२४ पासून MPT ( मास्टर ऑफ फिजोथेरपी ) पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रारंभ केला. या वर्षीची थीम हेल्दी एजिंग” Healthy ageing असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये शारीरिक सक्रियता वाढवणे, पडण्यापासून बचाव करणे,व दर्जेदार जीवनशैली टिकवणे यात फिजिओ थेरपिस्टची महत्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

जाहिरात
कम्युनिटी फिजिओथेरपी विभागातर्फे दिनांक ३ सप्टेंबर ३०२५ रोजी सडेगावात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिकांना झाला. तसेच फिजीओथेरपी विषयी जनजागृती करण्यात आली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ.गंगाधरण म्हणाले की हेल्दी एजिंग ही आरोग्य सेवेची एक महत्त्वाची गरज आहे.यामुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून बचाव होतो.व वृद्धांना स्वावलंबी जीवन जगता येते
कार्यक्रमाचा शेवट समारोप समारंभाने  झाला.यावेळी विविध स्पर्धांचे विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा केली.या कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटन आरजेएस फाउंडेशनचे चेअरमन चांगदेव काकडे,सचिव प्रसाद कातकडे, मॅनेजिंग डायरेक्टर प्रणित कातकडे, उद्योजक विजय कडू, दीपक कोटमे, प्राचार्य डॉ.गंगाधरन व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे