आपला जिल्हा

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६ : कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक श्री. संजय वसंतराव सातभाई यांचा शुक्रवार दि ३० ऑक्टोबर रोजी असलेला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. परशराम साबळे, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विशाल धरणगावकर, बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे प्रा विजय कापसे, निलेश देवकर आदींनी  संजय सातभाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.या प्रसंगी माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई उपस्थित होत्या.

जाहिरात

सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या  संजय सातभाई यांच्या मार्गदर्शनातून विविध उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन मिळत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे