आपला जिल्हा

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल चा दहावीचा १०० टक्के निकाल

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल चा दहावीचा १०० टक्के निकाल
अमृतवाहिनी मॉडेल स्कूल चा दहावीचा १०० टक्के निकाल
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १४ मे २०२५- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अमृतवाहिनी मडेल स्कूलने यावर्षीही आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून मॉडेल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य श्रीमती शोभा हजारे यांनी दिली आहे.

जाहिरात
माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ने कायम गुणवत्ता पूर्ण शिक्षणातून आपला लौकिक जपला आहे या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी आयएएस आयपीएस अधिकारी झाले असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या पदांवर काम करत आहेत. गुणवत्तापूर्ण दर्जेदार इंग्रजी शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या या मॉडेल स्कूल मधून 149 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 82 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये आदित्य मच्छिंद्र ढोले 95.20% गुण मिळून प्रथम आदिती दत्तात्रय खेडकर व सार्थक सुनील कांडेकर 93.80% गुण मिळून द्वितीय, प्रियंका शिवदास एखंडे 93% गुण मिळून तृतीय कल्याणी सुनील मेहेत्रे 92.80% गुण मिळून चतुर्थ आणि सिद्धी का अमित कुमार रासकर 92.80% गुण मिळून पाचवा क्रमांक मिळवला आहे.

जाहिरात

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा व्ही.बी धुमाळ, डॉ जे बी गुरव, प्राचार्य श्रीमती शोभा हजारे सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे