आपला जिल्हा

कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये होणार मोठी रस्सीखेच; तर बुधवारी ठरणार नगरसेवकांचे आरक्षण 

कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये होणार मोठी रस्सीखेच; तर बुधवारी ठरणार नगरसेवकांचे आरक्षण 
शहरातील अनके मातब्बर घराणे व उमेदवारांमध्ये होणार खरी लढत; कळणार कोणाची ताकद किती ते?
कोपरगाव विजय कापसे दि ७ ऑक्टोबर २०२५राज्यातील बहुप्रतिक्षित ३५२ नगरपरिषदेचे व १४७ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत सोमवार दि ६ ऑक्टोबर रोजी राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली.

 या आरक्षण सोडतीत अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या भुवया उंचावल्या असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ होण्याची शक्यता या जाहीर झालेल्या आरक्षण प्रवर्गातून दिसून येत आहे त्यामुळे सर्वच गटात कही खुशी कही गम असे चित्र समोर येणार आहे.

जाहिरात

कोपरगाव तालुक्यातील पारंपरिक राजकीय घराणे आसलेल्या  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे व भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गटाच्या  उमेद्वारामध्येच प्रमुख काटे की लढत होणार असली तरी या राजकिय परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पक्ष यांचा निर्णय काय असेल यावर तालुक्यात चर्चेला उधाण आले असून शहरातील गल्ली बोळात ऐन थंडीच्या तोंडावर वातावरण गरम होयला सुरुवात झाली आहे.

जाहिरात

कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी अपक्ष नगराध्यक्ष विजय वहाडणे, मागील वेळी उमेदवारी केलेलं कोल्हे गटाचे पराग संधान, यांच्या सह माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, दिनार कुदळे, राजेंद्र झावरे, योगेश बागुल,विजय आढाव आदी प्रमुख उमेदवारासह गेल्या अनेक वर्षात कायम चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांची नावे चर्चेत आहेतच परंतु यात आमदार काळे व युवानेते कोल्हे काय निर्णय घेता कुणाला उमेदवारी जाहीर करता हा निर्णय सर्वात महत्वाचा ठरणार आहेच त्यासोबत अपक्ष इच्छुक काय निर्णय घेतील हे पण तितकेच महत्वाचे असणार आहे.

प्रमुख लढत पराग संधान, दिनार कुदळे, राजेंद्र झावरे व मंगेश पाटील यांच्यातच होऊ शकते??

जाहिरात
बुधवारी जाहीर होणार  कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेकांचे आरक्षण
१. आरक्षण सोडत दिनांक:
•वार: बुधवार
•तारीख: ०८/१०/२०२५
•वेळ: सकाळी ११  वाजता
•स्थळ: तहसील कार्यालय, कोपरगाव
२. आरक्षण प्रसिद्ध करण्याचा दिनांक:
•वार: गुरुवार
•तारीख: ०९/१०/२०२५
३. हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी:
•वार: गुरुवार,
•तारीख: ९/१०/२०२५ ते
•वार: मंगळवार,
•तारीख: १४/१०/२०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती व सूचना मुख्याधिकारी यांचेकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे