आपला जिल्हा
कोपरगाव नगरपालिकेच्या १५ प्रभागाकरीता नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर
कोपरगाव नगरपालिकेच्या १५ प्रभागाकरीता नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर
१५ प्रभागात असणार ३० नगरसेवक

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑक्टोबर २०२५- बहूप्रतिक्षित राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी उमेदवाराकरीता आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग अहिल्यानागर सायली सोळंखे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव मधील १५ प्रभागातील नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

कोपरगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रातील १५ प्रभागातून प्रत्येक प्रभागात दोन सदस्य असे ३० सदस्य असणार असून यात
प्रभाग क्रमांक १
अ) जनरल (महिला)
ब) जनरल
प्रभाग क्रमांक २
अ) अनुसूचित जाती
ब) जनरल (महिला)
प्रभाग क्रमांक ३
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब) जनरल
प्रभाग क्रमांक ४
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब) जनरल
प्रभाग क्रमांक ९
अ) अनुसूचित जाती
ब) जनरल(महिला)
प्रभाग क्रमांक १०
अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग
ब) जनरल (महिला)
प्रभाग क्रमांक ११
अ) अनुसूचित जाती (महिला)
ब) खुला
प्रभाग क्रमांक १२
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब) जनरल
प्रभाग क्रमांक १३
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब) जनरल ( महिला)
प्रभाग क्रमांक १४
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब) जनरल (महिला)
प्रभाग क्रमांक १५
अ) अनुसूचित जाती (महिला)
ब) जनरल
या नुसार आरक्षण जाहीर झाले आहे.
तर या आरक्षण सोडती प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, नगरपालिकेचे उपमुख्यधिकारी मनोजकुमार पापडीवाल, नगररचना विभागाच्या आश्विनी पिंगळ, रश्मी प्रधान, रचना सहायक किरण जोशी आदी उपस्थित होते तर जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण वर हरकती व सूचना ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या कडे सादर करण्यात याव्या.









