गल्ली ते दिल्ली सत्ता असताना कोपरगाव वासियांचा हिरमोड-विवेक कोल्हे
गल्ली ते दिल्ली सत्ता असताना कोपरगाव वासियांचा हिरमोड-विवेक कोल्हे
गल्ली ते दिल्ली सत्ता असताना कोपरगाव वासियांचा हिरमोड-विवेक कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि ९ नोव्हेंबर २०२५– नुकतीच संपूर्ण राज्यभरातील नगरपालिका निवडणुकीचा धुराळा सुरू झाला असताना यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोपरगाव नगरपालिकेचा देखील समावेश असल्याने कोपरगाव शहरात राजकीय घडामोडीला वेग आला असताना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी शनिवार दि ८ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत आमदार आशुतोष काळे व नगरपालिका प्रशासन कारभारावर मोठे टीकास्त्र सोडले आहे.

या पत्रकार परिषद विवेक कोल्हे यांनी बोलताना सांगितले की, गेल्या चार वर्षापासून नगरपालिका निवडणूक झालेली नसल्याने त्यावर प्रशासक राज असल्याने आमदार आशुतोष काळे व मुख्याधिकारी यांनी एक संपूर्ण टर्मच कारभार पाहिला या कार्यकाळात कोणताही ठराव करताना निर्णय घेताना कोणाचीच अडचण होत नसे असा कारभार नगरपालिकेचा सुरू होता संपूर्ण गल्ली ते दिल्ली सत्ता असताना कोपरगाव शहरात कोणताही ठोस विकास न झाल्याने तसेकंज शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ तशीच असल्याने संपूर्ण शहर वासीयांची घोर निराशा झाली असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे.

या पत्रकार परिषद कोल्हे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोपरगाव नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात आमच्याकडून जास्तीत जास्त सर्व समाजातील युवकांना संधी देत सर्वांना समानन्याय दिला जाणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचे सांगत कोपरगावकरांच्या सर्वांगीण विकासाचा वचननामा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची जबाबदारी शहरातील अभ्यास व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित असलेले प्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल यांच्यावर सोपवली असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तसेच नागरिकांना या वचन नाम्यात काही कल्पना सुचवायच्या असतील तर visionkopargaon@gmail.com या मेलवर अथवा ८१८१९०९०९० या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्याच्या वैभवात टाकणाऱ्या नगरपालिकेची नवीन इमारत, बस स्थानक, वाचनालय, अग्निशामन बिल्डिंग, पंचायत समिती बिल्डिंग आदी उभ्या राहिल्या तर यावर आमदार काळे यांच्या मागील व आत्ताच्या कार्यकाळात कोणतेही दृश्य स्वरूपातील ठोस काम झाल्याचे दिसत नसल्याची टीका कोल्हे यांनी करत नगरपालिकेच्या ठेवी ५० लाखाहून अवघ्या २ ते ३ लाखांवर येऊन ठेपल्या आहे तर देण कोटीच्या घरात असल्याने नगरपालिका मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे या सर्व अडचणीतुन नगरपालिकेला व शहराला काढायचे असेल तर आम्हाला पूर्णपणे एक हाती सत्ता द्या असे आवाहन विवेक कोल्हे यांनी या पत्रकार परिषदेत कोपरगाव शहरवासीयांना केले आहे.




