आपला जिल्हा

प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उद्या होणार

 प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उद्या होणार

प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उद्या होणार

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० नोव्हेंबर २०२५:कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार (दि.२१) रोजी दुपारी ४.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर होणार आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ.आशुतोष काळे उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी दिली आहे. 

जाहिरात

मागील सहा वर्षापासून कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराचा विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून मोठा बदल झाला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरु झाली आहे. कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे तसेच रस्त्यांचा विकास व शहर सुशोभिकरण होवून शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. कोपरगाव शहराच्या विकासाची हि लय कायम ठेवण्यासाठी होवू घातलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच नगरसेवक पदासाठी देखील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

जाहिरात

आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराच्या विकासाची वीण अजून घट्ट करण्यासाठी हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम कोपरगावच्या उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात ठरणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ.आशुतोष काळे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून त्यांचे मार्गदर्शन व त्यांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे