आपला जिल्हा

कोपरगावात पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न

कोपरगावात पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न
कोपरगावात पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ एप्रिल २०२६–  पूर्वीची स्त्री घराच्या राहाटात अडकलेली होती आज तीचं स्त्री शिक्षणामुळे समाजाला दिशा दर्शक अशी भूमिका बजावत आहे. समाजाचे बंधन तोडून आजची स्त्री समाजात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून  कल्पना हिरालाल महानुभाव यांचा ३२ वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्ती सोहळ्याच्या दिवशी त्यांनी लिहिलेल्या पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा असल्याचे प्रतिपादन वात्रटिकाकार, कवी नारायण सुमंत यांनी केले.

एस जी विद्यालयातील शिक्षिका  कल्पना हिरालाल महानुभाव यांचा 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्ती सोहळा व  कल्पना हिरालाल महानुभाव यांनी लिहिलेल्या पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी नारायण सुमंत बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर तर अध्यक्ष म्हणून गोदावरी दूध संघांचे चेअरमन राजेश परजणे होते .

जाहिरात

प्रस्ताविकात हिरालाल महानुभाव म्हणाले की, सौ. कल्पना महानुभाव ह्या ३२ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. त्याचा पोस्टर पैलवान हा कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. माझ्या सामाजिक कार्यात  कल्पना यांचा पत्नी म्हणून सिंहाचा वाटा आहे. कोपरगाव तालुका सहाय्यक समितीच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था उभारत असतांना कौयोबिक सर्व जबाबदारी पत्नीने पार पडल्यामुळे मला यात कुठल्याही अडचणी आल्या नाहीत.

जाहिरात

अभिनेता चिन्मय उदगीरकर म्हणाले की, शिक्षक म्हणून ३२ वर्ष सौ कल्पना महानुभाव यांनी काम केल्यानंतर विनोदी भाषेतील साहित्याची मेजवानी ही रसिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.आजचे तरुण कोणतेही लेखन होतांना दिसत नाही.मोबाईन ने सगळे लेखन संपूवून टाकले आहे. त्याप्रमाणे लोकांचा वाचनाचा छंद संपला आहे. साहित्य परंपरा संपली तर मराठी भाषा व साहित्याची गंगा पुढे वाहणार कशी याची जास्त काळजी वाटते मात्र कल्पना महानुभाव यांचे पोस्टर पैलवान कथासंग्रहचा देखील समाजाला दिशा दर्शक ठरणार आहे.

राजेश परजणे म्हणाले की, निःस्वार्थ पणे कार्य केले तर भगवंत आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करत असतो. दगडी मूर्तित देव शोधन्यापेक्षा माणसात देव बघून काम करण्याची भूमिका हिरालाल महानुभाव व त्यांच्या पत्नी सौ कल्पना महानुभाव यांची असल्याचे शेवटी राजेश परजने म्हणाले आहे.

यावेळी डॉ. हिरालाल महानुभाव, कल्पना महानुभाव, राजेंद्र बापू जाधव, कैलास ठोळे ,आदिनाथ ढाकणे, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, माजी नगराध्यक्ष विजय वहाडने, कोल्हे कारखाण्याचे व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर परजने डॉ. अमोल अजमेरे, ऍड. सातव, ऍड शरद गुजर, डॉ. निखिल महानुभाव, डॉ. प्रतीक्षा महानुभाव, सुनील बोरा, कल्पेश शहा, तारा पाटील, संतोष तांदळे, गणेश कानडे, सचिव राजेंद्र साळूंके, केशवराव भोजने, प्रकाश आंबेकर, प्रा.काशिनाथ वाकचौरे,प्रा.नामदेव उबाळे, रवींद्र लोहाडे, नानासाहेब रनशूर आदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे